पाकिस्तानातून आलेले भारताचे पंतप्रधान व उपपंतप्रधान बनले - जे. पी. नड्डा

पाकिस्तानातून आलेले भारताचे पंतप्रधान व उपपंतप्रधान बनले - जे. पी. नड्डा

ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नव्हता.मात्र,आता हे कलमच रद्द झाल्याने सर्वांचा मार्ग खुला झाला आहे.असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश उर्फ जे.पी.नड्डा यांनी केले.जम्मू-काश्मिर आणि कलम 370 या विषयावर जनजागृती करण्यासाठी देशभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी आयोजित या कार्यक्रमास संबोधित करण्यासाठी नड्डा उपस्थित होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गडकरी रंगायतनमध्ये बहुतांश मुस्लिम बांधवाना बसेस भरून पाचारण करण्यात आल्याने तुडुंब गर्दी झाली होती.

‘जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवण्यासाठी संपूर्ण भारतवासी आग्रही होते. पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ते कलम हटवून वैचारिक लढाई जिंकली. या पार्श्‍वभूमीवर काही मुद्दे आणि भारतियांच्या भावना समजावून घेण्याची गरज आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते विशेष दर्जाच्या नावाखाली भारतीयांचे लक्ष विचलित करत होते. या कायद्याच्या पहिल्या पानावरचे कलम 370 हे हंगामी असून त्यात बदल करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष दर्जाला पाठिंबा मिळणार नाही हे पंडीत नेहरुंनी ओळखून शेख अब्दुल्ला यांना तत्कालीन कायदा मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यास सांगितले. या भेटीत डॉ.आंबेडकर यांनी सर्व सुविधा दिल्यानंतर त्यांच्या सिमेला संरक्षण देणे शक्य नसल्याचे सांगितले. महाराजा हरिसिंह यांनी जम्मु-काश्मिरचे भारतात विलिनीकरण करताना म्हटले होते की, भारताचे हे 15 वे राज्य असेल. जम्मू-काश्मिरमध्ये पहिली निवडणूक झाली. त्यावेळी डोगरा समाजाच्या 35 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र सर्व अर्ज शेख अब्दुल्ला यांनी अधिकार्‍यांमार्फत अवैध ठरवले. त्यामुळे त्यांचे 75 उमेदवार निवडून आले. त्यामुळेच त्यानंतर कलम 370 चा विरोध सुरु झाला’, असे श्री.नड्डा यांनी सांगितले.

‘जेव्हा फुटीरतावाद्यांना अब्दुल्लांकडून ताकद मिळू लागली, तेव्हा देशाला धोका होत असल्याचे नेहरु यांच्या लक्षात आले. यांनंतर दिल्ली करार झाला, जो अधिकृतरित्या नोंदवला गेला नाही. त्यात जम्मु-काश्मिरला विशेष दर्जा देण्यात आला. ही दुसरी चूक झाली. त्यावेळी झालेल्या आंदोलनात 10 हजार लोकांना अटक झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह 18 जणांनी बलिदान दिले’, अशी माहिती श्री.नड्डा यांनी दिली. ‘आतापर्यंत पश्चिम पाकिस्तानातून आलेले इंद्रकुमार गुजराल, डॉ.मनमोहन सिंग आणि लालकृष्ण आडवाणी हे भारतात येऊन पंतप्रधान आणि उप पंतप्रधान झाले,परंतु ते काश्मिरमधून निवडणूक लढवू शकले नाहीत. कलम 370 हटल्यामुळे आता एससी, एसटी वर्गातील लोकही निवडणुका लढवू शकतात. भाजपाने संकल्पपूर्ती केली आहे. देशाचे आणि जम्मू-काश्मिरचे भले केले आहे.मात्र आताच्या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचा आधार घेउन पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला.असे सांगून राहुल गांधी आणि ओमर अब्दुल्ला यांची खिल्ली उडवण्याची संधी नड्डा यांनी सोडली नाही.
 

बाल्कनीतील श्रोत्यांनी घेतला काढता पाय 
जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द केल्याच्या जनजागृतीसाठी भाजपच्या जनजागृती अभियानासाठी कळवा-मुंब्रा येथून बहुतांश मुस्लिम महिला व कार्यकर्त्यांना बसेस भरून आणण्यात आले होते.मात्र,जे.पी.नड्डा यांचे प्रवचन सुरु होताच बाल्कनीत बसलेल्या मुस्लिम महिलांनी काढता पाय घेतला.भाषण सुरु असतानाच श्रोते उठून जात असताना त्यांना अडवण्यासाठी देखील कुणीही नव्हते.त्यामुळे देशभर सुरु झालेल्या भाजपच्या या जनजागृती अभियानाला ठाण्यात खीळ बसल्याची चर्चा रंगली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com