उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मतातही मनाेमिलन I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

यंदाच्या निवडणूकीतील प्रचारादरम्यान या दाेघांत क्राॅस व्हाेटींग हाेईल अशी अटकळ बांधली जात हाेती. 

सातारा - लाेकसभा पाेटनिवडणूकीत उदयनराजेंचा पराभव तर सातारा विधानसभा निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचा विजय झाला. या दाेन्ही राजेंच्या निकालात विराेधाभास असला तरी सातारा विधानसभा मतदारसंघात दाेन्ही राजांना मिळालेल्या मतांमध्ये साम्य आहे. यावरुन दाेन्ही राजांमधील मतांच्या माध्यामातून घट्ट मनाेमिलन झाल्याची चर्चा आहे. 

दाेन्ही राजे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यातील दुही कमी झाली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही त्यांच्या सभेच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना एकत्रित घेतले हाेते. परंतु प्रचारादरम्यान या दाेघांत क्राॅस व्हाेटींग हाेईल अशी अटकळ बांधली जात हाेती. 

आज (गुरुवार) मतमाेजणीचे चित्र पुर्ण झाल्यानंतर सातारा विधानसभा मतदारसंघात दाेन्ही राजेंना जवळपास सारखेच मतदान झाल्याचे दिसून येत आहे. 
यामध्ये लाेकसभा निवडणूकीत उदयनराजेंना 1 लाख 18 हजार 898 असे मतदान झाले आहे. शिवेंद्रसिंहराजेंना 1 लाख 18 हजार 005 असे मतदान झाले आहे.
दरम्यान श्रीनिवास पाटील यांना 72 हजार 864 तर विधानसभेचे उमेदवार दीपक पवार यांना 74 हजार 581 मते मिळाली आहेत. 

लोकसभेचे विधानसभा निहाय मतदान 

विधानसभा ........... उदयनराजे भोसले........... श्रीनिवास पाटील 
वाई ...................... 95644 ...................... 122707 
कोरेगाव ................. 101638..................... 95953 
कऱ्हाड उत्तर ........... 63762........................ 114641 
कऱ्हाड दक्षिण........... 81701...................... 113550 
पाटण...................... 84489...................... 112348 
सातारा..................... 118898..................... 72864 
पोस्टल मते............... 2771.......................... 4557 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Lok Sabha 2019 election Udayanraje Shivendraraje uinted