Vidhan Sabha 2019:निर्णयाविनाच संपला रामराजे निंबाळकरांचा मेळावा; पाहा काय घडले?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. आज, त्यांच्या मेळाव्यात घोषणा होईल, यायची अपेक्षा होती. पण, तीदेखील फोल ठरली आहे.

फलटण (सातारा) : गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीला रामराम करून, शिवसेनेच्या शामियान्यात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, त्यांच्या पक्ष सोडण्याची आणि शिवसेना प्रवेशाची निव्वळ चर्चाच सुरू आहे. पण, निर्णय झालेला नाही. आज, निंबाळकर यांनी फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात रामराजे नाईक-निंबाळकर पक्ष सोडण्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असं सांगणाऱ्या नाईक-निंबाळकर यांचा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला. त्यामुळे रामराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

हाती 'शिवबंधन' बांधल्यानंतर, मिलिंद नार्वेकरांविषयी काय म्हणाले...

काय म्हणाले रामराजे?
रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘आमचे हिरो देवानंद, अमिताभ बच्चन नव्हते तर, शऱद पवार होते. आता माझ्या पुढं फक्त शरद पवार यांना न दुखावता तुमचं मन राखायचा आहे. आता माझ्या पुढं फक्त शरद पवार यांना न दुखावता तुमचं मन राखायचा आहे. आमची पार्टी शरद पवारच होते. राष्ट्रवादी नव्हे, मी त्यांच्याविषयी काहीच बोलणार नाही. त्याच्याबद्दल कायम आदराचे स्थान राहील. मुळात मला कोणीही अस्वस्थ करू शकत नाही. मध्यंतरी माझी 25 वर्षांची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या मनात कुठल्या पार्टीत जायचं? राष्ट्रवादी सोडायची का? हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे.’

उदयनराजेंचं ठरलं; भाजपप्रवेशाबाबत घेतला मोठा निर्णय

तुमच्याकडून निर्णय हवाय : रामराजे
आज, आज शशिकांत शिंदेच्या मतदार संघातील लोकही या मेळाव्याला आले आहेत, असा उल्लेख रामराजे निंबाळकर यांनी केला. ते म्हणाले, ‘राजकारण जर करायचं असेल आणि तरुण पिढीच्या इच्छा आकांशा राहिल्या नाहीत तर आपला काही उपयोग नाही. हल्ली राजकारणाच मार्केटग झालंय. मला कोणावर टीका करायची नाही. मी माझा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बोलावलंय. मला तुमच्या कडून एक निर्णय हवा आहे.’ विकासाच्या कामाला खरंच मत मिळतात का?, असा प्रश्न निंबाळकर यांनी मेळाव्यात उपस्थित केला. शिवेंद्रसिंहराजे सोडले तर औद्योगिकीकरण बाबत जिल्ह्यातील कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाही, असे सांगत त्यांनी शिवेंद्रसिंह राजेंचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘सध्या नुसती जत्रा भरली आहे. महामेळावा, महाभरती, असे शब्द वापरले जात आहेत. जायचीच वेळ आली तर पिढीचा विचार करून जावं लागेल. पण वेळ आली तर, माझ्या हातून झालं तर तुमचं सोनंच होईल कोळसा होऊ देणार नाही’

Vidhan Sabha 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील

दोन राजेंनी पक्ष सोडला, निंबाळकरांचे काय?
सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. आज, त्यांच्या मेळाव्यात घोषणा होईल, यायची अपेक्षा होती. पण, तीदेखील फोल ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramraje naik nimbalkar rally at phaltan ahead of resigning from ncp shivsena bjp