इंग्रजी ट्विटवरून पार्थ पवार झाले ट्रोल

टीम ई-सकाळ
Saturday, 28 September 2019

पार्थ पवार यांनी शरद पवार यांना अजित पवार यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. पार्थ यांनी याविषयीचे एक ट्विटही केले आहे. पण, त्या ट्विटवरून पार्थ यांना ट्रोल केले जात आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची माहिती कोणालाही नव्हती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयापासून अनभिज्ञ होते. या संदर्भात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी शरद पवार यांना माहिती दिली. पार्थ यांनी याविषयीचे एक ट्विटही केले आहे. पण, त्या ट्विटवरून पार्थ यांना ट्रोल केले जात आहे.

काय घडले?
अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषद माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी मला कोणतिही माहिती दिली नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांच्याशी संपर्क झालेला नसून, अजित पवार यांनी केवळ पार्थ पवारांना या निर्णायविषयी माहिती दिल्याचे सांगितले. अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत कुटुंबीयांशी राजीनाम्याबाबत चर्चा केल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. त्यानंतर पार्थ पवार यांनी हे ट्विट केले आहे.

काय आहे पार्थ यांचे ट्विट?
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मुलगा पार्थ पवार याने ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत अवघड होता. वडिलांबरोबर झालेले संभाषण आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना सांगितले आहे.’ इंग्रजीत असलेल्या या ट्विटवरून ट्विटवर पार्थ पवार लक्ष्य होत आहेत. As a head of our family हे त्यांना आपल्यासाठी म्हटल्याचे दाखवत, पार्थ यांच्या इंग्रजीतील चुका काढल्या आहेत. पार्थ स्वतःला कुटुंबप्रमुख कसे काय म्हणू शकतात, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parth pawar gets trolled after tweet ajit pawar sharad pawar ncp