जळगावच्या चार तालुक्‍यांत अतिवृष्टी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत संततधार पाऊस झाल्याने धरणगाव, यावल, अमळनेर व चोपडा तालुक्‍यात ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.

जळगाव - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत संततधार पाऊस झाल्याने धरणगाव, यावल, अमळनेर व चोपडा तालुक्‍यात ६० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) गेल्या मंगळवारपासून संततधार पाऊस आजपर्यंत सुरू आहे. असा पाऊस सुरू असल्याची घटना गेल्या सात आठ वर्षांनंतर प्रथमच घडल्याचे जुने जाणकार सांगतात.

गेल्या पाच-सहा वर्षांत अशा प्रकारची पावसाची झडी झालीच नव्हती. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in the four talukas of Jalgaon