नाशिकच्या आदिवासी भागांत 'ती' चे स्वागत 

girls birth.jpg
girls birth.jpg

नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाल्याने सामाजिक मानसिकतेत बदल होत असल्याचे स्पष्ट झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुका मुलींच्या जन्मदरात अव्वल आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९६९ असा मुलींचा जन्मदर आहे. यापाठोपाठ मुलींच्या जन्मदरात नाशिक तालुका दुसऱ्या तर येवला तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील एकुण मुलींचा जन्मदर हा ९६९ होता. मात्र चालु वर्षी हा थोड्या प्रमाणात घसरुन ९६१ झाला आहे. परंतु सप्टेंबर महिन्याअखेर तो वाढण्याचीही चिन्हे आहेत. जिल्ह्यातील बागलाण, इगतपुरी, कळवण, सुरगाणा या तालुक्‍यांत मुलींच्या जन्मदरात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याच आदिवासी भागातील पेठ तालुक्‍यात तो कमी आहे. या तालुक्‍या एक हजार मुलांमागे ८४७ मुली असा जन्मदर आहे. 

मुलींच्या जन्मदरात कळवण अव्वल तर पेठ मागे 

राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे राज्य व केंद्र सरकारने मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या विषयी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मुलींना शिक्षणाच्या अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली, त्याच प्रमाणे "बेटी बचाओ बेटी पढाओ', "सुकन्या समृद्धी योजना', "लाडकी लेक योजना', "कन्या विवाह योजना', यांसारख्या अनेक योजना देखील यशस्वी केल्या आहेत. गाव पातळीवर आशा कार्यकर्ती मार्फत गरोदर महिलाना सनियंत्रण ठेवण्यात येते. पंतप्रधान महिला सुरक्षित मातृत्व योजनेत गरोदर महिलांचे मोफत औषधोपचार, सोनोग्राफी आणि बाळांतपण करण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लिंग गुणोत्तर नोंद ठेवण्यात आली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यातील स्त्री जन्मदर वाढला असल्याचे चित्र आहे. 

 तालुकानिहाय मुलींचा जन्मदर 

तालुका       2017 - 2018        2018 - 2019 (ऑगस्ट 2019पर्यंत) 
कळवण        1008                     1018 
नाशिक         1031                      990 
येवला            962                      987 
नांदगाव         986                       982 
बागलाण        919                       946 
चांदवड         970                       951 
देवळा           927                       927 
दिंडोरी          992                       960 
इगतपुरी        959                       925 
मालेगाव        986                       962 
निफाड         959                       974 
सिन्नर           985                       966 
त्र्यंबकेश्‍वर    963                       977

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com