नाशिकमधील 'या' शाळेला आयएसओ मानांकन 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 18 October 2019

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे. 

नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे. 

विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा
आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान प्रयोगशाळा प्रत्येक वर्गात उत्तम प्रकाश योजना, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन यंत्र, शौचालय सुविधा, वाचनालय संरक्षक भिंत, जुन्या रेकॉर्डची मांडणी, शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम, इन्वर्टर सुविधा देतांना सर्वात महत्वाचा म्हणजे स्थानिक ग्रामस्थांचा शाळेच्या कामकाजातील सक्रिय सहभाग वाढविला आहे. त्या जोरावर वीजबचत, पाणीबचत स्वच्छता संदेश पाण्याची सुविधा मूलभूत विषय राबविले आहे. शाळेच्या अंर्तगत बाह्य रचनेनुसार कामकाज करतांना विद्यार्थ्यांना काळानुरूप तंत्रज्ञानात ही अवगत असावे यासाठी डिजीटल क्‍लासरुमसारखे विविध ५० मानांकन पूर्ण केली आहे. 

स्थानिक ग्रामस्थांचा शाळेच्या कामकाजातील सक्रिय सहभाग
शिवडे गटातील शाळेत 485 विद्यार्थ्याचा पट आणि 17 कर्मचारी अशा शाळेत कौटुबिक वातावरण जपले आहे. शाळेपुढील विविध समस्यांवर सर्वजण मिळून मार्ग काढत असतात. त्यातूनच जि.प.ची शिवडे शाळा विविध सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी शाळा बनली आहे. शाळेला हे मानांकन मिळण्यात आयएसओ समितीचे जगदिश वरखेडे, गट शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव लहामगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवडेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू हारक ,उपाध्यक्ष अंबादास वाघ,मुख्याध्यापक अशोक नेवरे,संजय बोरसे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा आणि ग्रामस्थांचा सहभागामुळे सिन्नर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शिवडे शाळेने आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivde School have achieved ISO rating