यंदा फटाके विक्रेत्यांची दिवाळी जोरात

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

दिवाळी असो व निवडणुका फटाके वाजणार .. त्यामुळे दिवाळीसारखे सण उत्सवाचे दिवस जवळ येऊ लागले तसेच, राज्यातील निवडणुकांचा काळ सुरू असल्याने फटाके विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जादा घाऊक माल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. त्यामुळे फटाके बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

मनमाड : दिवाळी असो व निवडणुका फटाके वाजणार .. त्यामुळे दिवाळीसारखे सण उत्सवाचे दिवस जवळ येऊ लागले तसेच, राज्यातील निवडणुकांचा काळ सुरू असल्याने फटाके विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी मागील वर्षापेक्षा जादा घाऊक माल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. त्यामुळे फटाके बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

दिवाळीसोबत निवडणुका असल्याने फटाक्यांची मागणी वाढणार 

दर वर्षी दिवाळी आली की आकाशात फटकाक्यांचे रंगीबेरंगी कारंजागत उडतांना दिसतात कानाला फटकाक्यांचे आवाज आले तरच दिवाळी आल्यासारखी वाटत असल्याचे अनेक जण म्हणतात सण असो वा उत्सव या दिवसांमध्ये फटाक्यांची विक्रमी विक्री होतच असते; परंतु यंदा दिवाळी सोबत विधानसभा निवडणुका असल्याने फटाक्यांची मागणी वाढवणार असल्याचा अंदाज घाऊक फटाके विक्रेत्यांना वर्तवली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी अधिकच्या फटाक्यांचा साठा करण्याचे ठरवले आहे. फटाके विक्रेत्यांनी राज्यासह परराज्यातून फटाक्यांच्या वितरकांकडे वाढीव मागणी नोंदवली आहे. राज्यात फटाक्यांची चांगली विक्री होत असल्याने दिवाळीच्या दिवसात मोठी उलाढाल होत असते. अनेक फटाके विक्रेत्यांनी फटाक्यांचा वाढीव साठा ठेवण्यासाठी अतिरिक्त जागेचे व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट असले तरी, फटाके बाजारावर त्याचा परिणाम होणार नाही. असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, the fireworks of the fireworks vendors are loud