#saathchal पालखी सोहळा म्हणजे आनंदाचा झरा

विलास काटे  
Friday, 5 July 2019

फलटण - पालखीबरोबर चालताना कोणताही त्रास वाटत नाही, याचे कारण संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा सहवास. माउलींचा पालखी सोहळा म्हणजे आनंदाचा झरा असून, तो पंढरीकडे सरकत राहतो. हा सोहळा ऐश्‍वर्याचा महासागरच आहे, अशी भावना गोरोबा जडगे यांनी व्यक्त केली. 

माउलींच्या पालखी सोहळ्यात दिंडी क्रमांक ५८ मध्ये गोरोबा चालत आहेत. सोहळ्याबद्दल ते सांगतात, मी संत तुकाराम महाराज पालखीसोबत चालत होतो. यंदा प्रथमच या सोहळ्यात सहभागी झालो. येथेही तोच आनंद आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे पंढरीची वारी आहे. सांसारिक सुख हे खरे सुख नसते. पण पारमार्थिक सुख आत्मिक समाधान देते, म्हणूनच लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. वारीत प्रत्येक जण एकमेकांमध्ये माउली शोधतो. त्यामुळे त्याला संतांच्या संगतीचे सुख मिळते. दररोजच्या वाटचालीत तो प्रत्यय येतो. विषयसुखाच्या मागे लागून लोक दुःखाला कारण ठरतात. पण वारीत सर्व विसरून चालतात आणि मोक्षाची प्राप्ती करून घेतात. सुखाची व्याख्या वारीतच समजते. अखंड भजन करायचे, त्यामुळे कोणतेही दुःख समोर दिसत नाही. 

संस्थानिकांकडून शाही स्वागत
संस्थानिकांची नगरी असलेल्या फलटणमध्ये राम मंदिराजवळ पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. पालखी शुक्रवारी (ता. ५) बरड मुक्कामी जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palkhi sohala is the happiness