Wari 2019 : ध्यास श्री विठ्ठलाचा; वसा समाजप्रबधनाचा

डोर्लेवाडीची दिंडी
डोर्लेवाडीची दिंडी

पारंपारिक वारीतील दिंड्या व त्यांच्या प्रथा परंपरा पाळल्या जातातच. मात्र त्याही पलिकडे एक कुटुंब म्हणून दिंडीकडे पाहून त्याद्वारे समाज प्रबोधनाचा वारसा चालवण्याचे कामही केले जात आहे. त्या कामात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथी दिंडींचे काम पथदर्शी आहे. दिंडी सुरू झाली, मात्र ती केवळ दिंडी न राहता. एक चळवळ बनली आहे. समाज प्रबोधनाचा वारसा तर दिंडीला आहेच. मात्र दिंडीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्याचे काम उभा राहत आहे. दिंडीने भारूड कला जोपसाली आहे. चोवीॊ वर्षापासून दिंडीने भारूडी केलेतून अनिष्ठ रूढी परंपर  व अंधश्रद्धेवर आसूड ओढले आहेत. चोवीस वर्षात भारूडी कलेतून जे काही मानधन मिळाले. ते कधीही त्या कलातारांनी स्वत:साठी वापरले नाही. ते साठवून ठेवले आहे. चोवीॊ वर्षात सुमारे आठ लाख रूपये जमले आहेत. ते आता दंडीच्या पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मठासाठी वापरले जाणार आहेत. 

दिंड्याचा समाजप्रबोधनासह समाज कार्यात सहभाग किती असावा, यावर अनेक चर्चा घडविल्या जातात. मात्र त्या सगळ्या चर्चांना मानके तोडत दिंडीने आगळे वेगळे काम उभा केले आहे. डोर्लेवाडीसह दिंडीने ध्यास श्री विठ्ठवलाचा ठेवला असला तरी वसा मात्र समाज प्रबोधनाचाच घेतला आहे.

दिंडी प्रमुख बाळासाहेब नाळे महाराज आहेत. अत्यंत परफेक्ट व्यक्ती अशी त्यांची वारकरू सांप्रदायात प्रतिमा आहे. दिंडी गावाच्या विकासात सहभाग घेवून कायापालट करू शकते हीच गोष्ट कोणाला पटत नाही. त्यामुळे या दिंडीच्या कामाला पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. दिंडी म्हटल की, वारीच्या काळ आठवतो. मात्र डोर्लेवाडीच्या दिंडीने वर्षभर समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. चोवीस वर्षात सुमारे तीन हजार पेक्षा जास्त भारूडाचे जाहीर कार्यक्रम दिंडीने घेतले आहे. राज्यात ही अशी एकमेव दिंडी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिंडीतर्फे भटक्या विमुक्त जातीच्या वैदू समाजासाठी सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. परिक्षा देणाऱ्यासाठी मार्गदर्शन शिबीरही घेतले जाते. पुणे जिल्ह्याती  पहिली दारूबंदू डोर्लेवाडीच्या दिंडीने केली. बार बंदीही येथे झाली. गावात होणारी सार्वजनिक मांसाहारी जत्राही बंद करण्यात दिंडीने पुढाकार घेतला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना संगणक शिक्षणासाठी दिंडी दत्तर घेत असते.

आत्तापर्यंत पंचवीस पेक्षा जास्त मुलांना दत्तक घेवून संगणक साक्षर केले आहे. गावातील दोन हजारावर ज्येष्ठ नागरीकांच्या डोळ्यांच्या शस्रक्रीयीही केल्या आहेत. गावात एेक्य टिकून रहावे, यासाठी सामाजिक सलोख्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. दिंडीचा पंढरपूर येथे स्व मालकीचा मठ असावा असी कल्पना दिंडीने सप्ताहाच्या समारोपात गावकऱ्यांसमोर मांडली. गावात 1600 उंबरा आहे. प्रत्येक घरातून पाचशे रूपये याप्रमाणे आठ लाख रूपये एकाच दिवशी जमा झाले. भारूडी कलेतून आठ लाख रूपये जमा करण्यात आले. गावातील काही महत्वाच्या लोकांनी देणगी दिली. काही लोकांनी घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून मठासाठी आर्थिक हातभार लावला आहे. गावात एकी एवढी आहे, कोणताही अवैध व्यवसाय तेथे थाऱ्यालाच येत नाही. गावात राजकारण आहे, मात्र राजकीय मतभेदा पलीकडे वैरत्व नाही. त्या सगळ्यााचा पाया दिंडी घालून दिला आहे.

गावची यात्रा म्हणजे तुकारान बीज होय, या दिवशी जवळपास देहू नंतरची सर्वात मोठी गर्दी डोर्लेवाडीत असते. किमान लाखभर लोक येतात. गाव अवघे 1600 उंबऱ्याचे. तुकाराम बीज दिवशी गावात भाविक येतात. लाखाच्या घरात मात्र एकजणही उपाशी राहत नाही. त्या दिवशी गावात घरटी किमान पन्नास लोकांचा स्वयंपाक केलेला असतो. गावातील तरूऩ अत्यंत प्रामाणीकपणे काम करतात. ज्येष्ठ त्यांना समाजवून घेतात. हा मिलाफ अनाकलनीय आहे. वारकरी म्हटल की ठराविक ढाचा, त्यांची नाम साधना, भजन, किर्तन ते ह.भ.प. अशा गोष्टी प्रत्येकाच्या नजरेसमोर सहजपणे उभा राहतात. मात्र डोर्लेवाडीच्या काळे महाराज दिंडीने जरा हटके काम केले आहे. त्यामुळे दिंडीची समाजाशी नाश अधिक घट्ट झाली आहे. दिडीने ध्यास श्री विठ्ठलाचा ठेवतानाच वसा मात्र समाज प्रबोधनाचाच उचलल्याचे स्प्ष्ट जाणीव होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com