Wari 2019 : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले विठ्ठल मंदिर

भारत नागणे
रविवार, 7 जुलै 2019

गेल्या तीन वर्षांपासून विठ्ठल मंदिरावर विद्युतरोषणाई करण्याचे काम करीत आहे. यंदा जवळपास एक लाखाहून अधिक लहान-मोठ्या दिव्यांचा वापर करून आकर्षक पद्धतीने रोषणाई केली आहे.  
- विनोद जाधव, पुणे

पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त  विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर आकर्षक आणि रंगीबिरंगी अशा एक लाखाहून अधिक विद्युत दिव्यांची नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या सप्तरंगात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर व परिसर न्हाऊन निघाला आहे. मंदिरावरील नयनरम्य अशी ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची सायंकाळी गर्दी होत आहे. 

पुणे येथील विठ्ठलभक्त विनोद जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून मनोभावे विनामोबदला आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करतात. मंदिराच्या मुख्य शिखरावर जवळपास लहान दिव्यांच्या दीडशे माळांची विद्युत रोषणाई केली आहे. यामध्ये जवळपास २०० प्रकारच्या विविध हालचाली पाहायाला मिळतात. यंदा जाधव यांनी प्रथमच अधिकाधिक एलईडी दिव्यांचा वापर केला आहे. याबरोबरच संत तुकाराम भवन आणि  संत ज्ञानेश्वर दर्शनमंडपावरही रोषणाई केली आहे. यामध्ये दर्शनमंडपाच्या  दर्शनी भागावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांचे वॉलपेपर तयार करण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Vittal Temple Lighting Pandharpur Aashadhi Wari