सीमावर्ती तालुक्यात मराठी शाळांचाच डंका! अक्कलकोट, द. सोलापूर, मंगळवेढ्याची स्थिती

कर्नाटक लगतच्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६२५ शाळा आहेत. त्याअंतर्गत ५८ हजार विद्यार्थी शिकत असून २२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कन्नड भाषिक लक्षणीय असतानाही 'कन्नड'च्या केवळ ७८ शाळा आहेत.
शाळा
शाळाEsakal

सोलापूर : कर्नाटकला लागून असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६२५ शाळा आहेत. त्याअंतर्गत ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या शाळांमध्ये २२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे तिन्ही तालुक्यात कन्नड भाषिकांची संख्या लक्षणीय असतानाही तेथे कन्नड माध्यमाच्या केवळ ७८ शाळा आहेत. कन्नड माध्यमापेक्षाही मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८० टक्क्यांवर आहे.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर व अक्कलकोट आमचेच असल्याचे वक्तव्य करीत जुन्या वादाला नवे तोंड फोडले. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला येण्याजाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत, शेतीला पाणी नाही, शिक्षणाची पुरेशा सोयी-सुविधा नाहीत असे म्हणत दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील २८ गावातील नागरिकांनी ‘पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी, वीज, शिक्षण) द्या, अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे. त्यामुळे आमच्या तालुक्यातील एकही नागरीक कर्नाटकात जायला तयार नाही, असा दावा करणारे लोकप्रतिनिधी तोंडघशी पडले. परंतु, कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्रातील सीमावर्ती प्रत्येक गावांमध्ये ‘महावितरण’ची पोहचली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली. दुसरीकडे दोन्ही तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक असून त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी स्पष्ट केले. वीज आणि शिक्षण या बाबी सोडून रस्ते, पाणी या सुविधांवरून सीमावर्ती भागातील गावकरी कर्नाटकात जाण्याची भूमिका घेत असल्याची स्थिती आहे.

तिन्ही तालुक्यातील शाळांची सद्यस्थिती

  • एकूण शाळा

  • ६२५

  • विद्यार्थी संख्या

  • ५७,७०१

  • कन्नड शाळा

  • ७८

  • एकूण शिक्षक

  • २,५२३

शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक देण्याचा प्रयत्न

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीचशे शिक्षकांची पदे रिक्त आहेत, पण सीमावर्ती भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अधिक आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

२२ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक

‘आरटीई’नुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा असा नियम घालून देण्यात आला आहे. पण, राज्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची जवळपास २९ हजार पदे रिक्त असल्याने बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक कमीच आहेत. तरीदेखील अक्कलकोट तालुक्यातील २५७ शाळांमधील २३ हजार १५७ विद्यार्थ्यांसाठी एक हजार ५०, तर दक्षिण सोलापुरातील १८८ शाळांमधील २१ हजार विद्यार्थ्यांसाठी ८६८ शिक्षक आहेत. मंगळवेढ्यातील १८३ शाळांमधील १३ हजार ५१५ विद्यार्थ्यांसाठी ६०५ शिक्षक आहेत. हे प्रमाण २२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com