Tunisha Sharma : दहा दिवसांपूर्वी तुनिषाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं; काकाचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma

Tunisha Sharma : दहा दिवसांपूर्वी तुनिषाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं; काकाचा धक्कादायक खुलासा

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. तुनिषानं अवघ्या २०व्या वर्षीच आपलं जीवन संपवल्यानं टीव्ही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. (reason behind Tunisha Sharma suicide may be this need to know What exactly happened)

ब्रेकअप झाल्यामुळे तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी मोठी कारवाई करत वालिव पोलिसांनी अभिनेत्री तुनिशा शर्माचा सहकलाकार शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केलीये. पोलिसांनी (Waliv Police) शीजानविरुद्ध भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी या प्रकरणामध्ये एक खुलासा केला आहे. दहा दिवसांपूर्वी तुनिषा नैराश्येमध्ये गेली होती. प्रकृती अस्वस्थ्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा तिने तिच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं असून फसवणूक झाल्याचंही स्पष्ट केलं होतं, असं तिच्या काकांनी एएनआयशी बोलतांना सांगितलं.याशिवाय तुनिषा आणि झिशान एकमेकांच्या जवळ होते, असंही तिच्या काकांनी सांगितलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तुनिषा प्रेग्नंट असल्याचं E24 नं दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं. ती प्रेग्नंट असताना बॉयफ्रेन्डनं तिला लग्नाला नकार दिल्याचंही यात म्हटलं आहे. हेच तिच्या मृत्यूमागील कारणंही असण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्या घरच्यांनी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :actress