Hunger Strike: महाराष्ट्र हादरला; लढता लढता १० वर्षांचा चिमुरडा धारातीर्थी! कुटुंबावर दुसरा आघात

Hunger Strike in Barshi Solapur
Hunger Strike in Barshi Solapuresakal

Hunger Strike in Barshi Solapur

सोलापूरः सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिव्यांगनिधीसाठी स्मशानभूमीमध्ये आंदोलन करणाऱ्या १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरून गेलाय.

बार्शीतल्या चिखर्डेतील कुरुळे कुटुंबाचं मागील तीन महिन्यांपासून दिव्यांगनिधीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी कुरुळे कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला होता. आज या कुटुंबातील १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

ग्रामपंचायतमध्ये ५ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखवी असतो. मात्र काही वर्षांपासून निधी मिळत नव्हता. त्यामुळे कुरुळे कुटुंबाने आंदोलनाचं हत्यार उपसलं. ऑगस्ट महिन्यापासून ते आंदोलन करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निधी देण्याबाबत आणि दोषींवर कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु पुढे काहीही झालं नाही.

Hunger Strike in Barshi Solapur
Gujarat Elections 2022: गुजरातमध्ये कसा आहे मतदारांचा प्रतिसाद? जाणून घ्या सर्व अपडेट्स

आता पंधरा दिवसांपूर्वी या पीडित कुटुंबाने पुन्हा उपोषण सुरु केलं. यातच १० वर्षांच्या संभव कुरुळे या मुलाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू होऊन १८ तास उलटले आहेत. नातेवाईकांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावेळी प्रहार संघटनेच्या संजिवनी बारगुळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com