राज्यात कोरोनामुळे १०० पोलिसांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

मागील २४ तासांत १३८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. पोलिस दलातील सध्या  रुग्णांची संख्या एक हजार ९१२ इतकी आहे; तर ९ हजार ९६ पैकी ७ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. आत्तापर्यंत तब्बल १०० पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात मुंबई, ठाण्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला; तर मुंबईतील एक साहाय्यक पोलिस आयुक्त व त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या नऊ हजार ९६ वर पोचली आहे. यात सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबई पोलिसांचे आहे. मागील २४ तासांत १३८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. पोलिस दलातील सध्या  रुग्णांची संख्या एक हजार ९१२ इतकी आहे; तर ९ हजार ९६ पैकी ७ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुतांश पोलिस हे पुन्हा नागरिकांच्या रक्षणासाठी सेवेत रुजूही झाले आहे. 

राज्यातील १०० मृत पोलिसांमध्ये ८ अधिकारी आणि ९२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 police death due to the corona in the state