सणोत्सवांच्या काळात प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वेच्या १०४ विशेष गाड्या धावणार; कुठे किती फेऱ्या?

train
trainesakal

मुंबई: दसरा, दिवाळी, छठ पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने १०४ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १०४ विशेष गाड्यांपैकी मुंबई ते नागपूर, मुंबई ते बल्हारशाह आणि पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या ४८ विशेष गाड्या असणार आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांच्या एकूण २० फेऱ्या नियोजित आहेत. ही सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस सीएसएमटी येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान दर सोमवार आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहचेल.

तर २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी दुपारी १. ३० वाजता नागपूर येथून ही सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल. या दोन्ही विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांत थांबा असणार आहे.

train
Video : ''एका ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले'', OBC परिषदेतून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

दुसरीकडे नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१० फेऱ्या) असणार आहे. ही सुपरफास्ट स्पेशल १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ही सुपरफास्ट स्पेशल २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

तर गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

train
Chandrakant Patil: "बारामती लोकसभा जिंकायची आहे"; पुणे पालकमंत्रीपद गमावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

अशा असतील फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस -समस्तीपूर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल- १४ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस साप्ताहिक विशेष १४ फेऱ्या, मुंबई ते मंगळुरु जंक्शन साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या, पुणे जंक्शन ते अजनी वातानुकूलित सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या आणि पुणे ते गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्यांचा १४ फेऱ्या असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com