esakal | राज्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक; एकाच दिवसात ११ हजार रुग्णांची नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी पुण्यात आढळला होता त्यानंतर सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.गेल्या २४तासांत राज्यात२६६जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या१४हजार७२९एवढी झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक; एकाच दिवसात ११ हजार रुग्णांची नोंद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक वाढत असून गुरुवारी ११ हजार १४७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ११ हजार ७९८ इतकी झाली आहे. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी पुण्यात आढळला होता त्यानंतर सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २६६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १४ हजार ७२९ एवढी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के आहे. 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी चार लाख ११ हजार ७९८ (१९.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एका दिवसात आठ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण दोन लाख ४८ हजार ६१५ कोरोनाबाधित खडखडीत बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यात आज रोजी एकूण एक लाख ४८ हजार १५० सक्रिय रुग्ण आहेत. त्यांचे विविध रुग्णालयांमध्ये किंवा घरात विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण संख्या पुण्यातील आहे. पुण्यात ४८ हजार ८१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा