Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

राज्यातील खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त जागांवर मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या फेरीत मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
Teacher Recruitment

Teacher Recruitment

sakal

Updated on: 

पुणे - राज्यातील खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त जागांवर मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या फेरीत मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. २७ हजार १५४ प्राध्यान्यक्रमावर शिफारस झालेल्या उमेदवारांची नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शाळांमधील रिक्त जागांवर १:३ या प्रमाणात शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ४५ दिवसांत करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

Loading content, please wait...