esakal | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ११६; आरोग्यमंत्र्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

116 Total Corona Patients In Maharashtra Says Rajesh Tope

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातललेले असताना भारातातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ११६वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ११६; आरोग्यमंत्र्यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातललेले असताना भारातातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ११६वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ होती. त्यामध्ये ०९ची भर पडली असून ती संख्या आता ११६ वर गेली आहे. आज (ता.२५) सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर मुंबईतल्या चार व्यक्ती आहेत. त्यांना प्रवासामुळे संसर्ग झाल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचेही टोपे यांनी सांगितलं आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.