मुंबई - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. त्यासाठी सोमवारी (ता. १९) विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापूर्वी सराव करण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी या हेल्पलाइनचा बोजवारा उडाला.