
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेला किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (World Heritage Site - WHS) शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.