निलंबनाचा कालावधी कमी करा, १२ आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना विनंती पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP 12 MLA Suspended

निलंबनाचा कालावधी कमी करा, १२ आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना विनंती पत्र

मुंबई : आम्हाला मतदारांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवले आहे. पण, आमच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने हिवाळी अधिवेशनात ((Maharashtra Assembly Winter Session 2021) मतदारांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. त्यामुळे आमच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा एकदा फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती करणारी पत्र भाजपच्या १२ आमदारांनी (BJP 12 MLA Suspended) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवली आहेत.

काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन गदारोळ घातला होता. तसेच विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केली होती. त्यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. भाजपा आमदार आणि विधानसभा मुख्‍य प्रतोद अॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्यांनी निलं‍बनाविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे. ही याचिका सर्वोच्‍च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून 11 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्‍यावेळी न्यायालयाने सरकार आणि विधिमंडळाला आपली बाजू मांडण्‍यास सांगितले आहे.

दरम्‍यान, ही याचिका दाखल करुन घेताना न्‍यायालयाने या आमदारांचा आपल्‍या निलंबनाचा कालावधी कमी करण्‍यासाठी विधानसभा अध्‍यक्षांना विनंती करण्‍याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. त्‍यानुसार आमदार अॅड. आशिष शेलार यांच्‍यासह 12 आमदारांनी प्रत्‍येकांनी स्‍वतंत्रपणे पत्र लिहून विधानसभा उपाध्‍यक्षांना विनंती केली आहे.

टॅग्स :Bjp