Cm शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देणार; दसरा मेळावा ठरणार खास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

15 corporators from mumbai will join the shinde group in the Dasara Melava

Cm शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देणार; दसरा मेळावा ठरणार खास

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. अशातच मुख्यमंत्री शिंदे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणखी एक धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर मुंबईतील १० ते १५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (corporators from mumbai will join the shinde group in the Dasara Melava)

मुंबईतील १० ते १५ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दसरा मेळाव्यात हे नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या जवळचा एक नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबईतील ४० नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यातील १० ते १५ नगरसेवक दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. दूसरीकडे या मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

Web Title: 15 Corporators From Mumbai Will Join The Shinde Group In The Dasara Melava

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..