महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 198 कोरोनाबाधितांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Saturday, 4 July 2020

5 लाख रुग्ण होम क्वारंटाईन

- पुण्यातही रुग्णांची संख्या वाढतीये

पुणे : देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच यातील मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 6 हजार 234 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यामध्ये 198 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाख 92 हजार 990 वर गेली आहे. सध्या राज्यभरात 79,911 ऍक्टिव्ह केसेस आहेत. याशिवाय एक लाख 4 हजार 627 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 8,376 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही दिली आहे.

5 लाख रुग्ण होम क्वारंटाईन

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. 79,911 इतकी सध्या रुग्णांची संख्या राज्यात आहे. तर सध्या 5,89,448 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय 42,371 रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

पुण्यातही रुग्णांची संख्या वाढतीये

पुणे शहरात शुक्रवार दिवसभरात नव्याने 807 रुग्ण आढळले. सध्या पुण्यात 19,849 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.  त्यामुळे आज अखेर 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

COVID-19

नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. साने यांच्यावर पिंपरी येथील खासगी रुग्णालयात 25 जूनपासून उपचार सुरु होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 198 corona patients died in Maharashtra in last 24 hours