दोन महिन्यांत ६३.५५ लाख क्विंटल कांदा विक्री! सोलापूरला लागणार अनुदानासाठी २२२ कोटी

सोलापूर जिल्ह्यात १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३,५५,१८६ क्विंटल कांदा विकला गेला. अंदाजे एक लाख शेतकऱ्यांसाठी २२२ कोटी ४३ लाख १५ हजार १०० रुपयांचे अनुदान लागणार आहे. त्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी पणन मंडळाला सादर केली आहे.
onion
onionsakal media

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३ लाख ५५ हजार १८६ क्विंटल कांदा विकला गेला आहे. शासन निर्णयाप्रमाणे अंदाजे एक लाख शेतकऱ्यांसाठी २२२ कोटी ४३ लाख १५ हजार १०० रुपयांचे अनुदान लागणार आहेत. त्यासंबंधीची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी पणन मंडळाला सादर केली आहे.

अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या बळीराजाला कांद्याचे दर गडगडल्याने मोठा फटका सोसावा लागला. काही शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. अशावेळी राज्य सरकारने फेब्रुवारी व मार्च महिन्यांत कांदा विक्री केलेल्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु, परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी हे अनुदान नसणार आहे.

शेतकऱ्यांनी अनुदानासाठी कांदा विक्री केलेली आडत व्यापाऱ्यांकडील पावती, सातबारा उतारा व बॅंक बचत खाते क्रमांक जोडून साध्या कागदावर अर्ज करावा, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. २३ तारखेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. सातबारा आई किंवा वडिलांच्या नावे आहे, पण कांदा विक्री मुलाने किंवा त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्ती केली आहे.

अशावेळी विक्रीपट्टी मुलाच्या किंवा इतर सदस्यांच्या नावे असल्यास उतारा ज्यांच्या नावे आहे, त्यांनी सहमती दिल्यास त्या व्यक्तीच्या नावे अनुदान वितरीत केले जाणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी पाठवलेल्या प्रस्तावाची पडताळणी पणन मंडळ करेल. त्यानंतर अंतिम मान्यता मिळाल्यावर एप्रिलअखेर अनुदान वितरीत होईल.

कांदा विक्रीची माहिती पणन मंडळाला पाठवली

जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३ लाख ५५ हजार १८६ क्विंटल कांदा विक्री झाला आहे. त्यासंबंधीची माहिती बाजार समित्यांनी दिली असून त्याचा प्रस्ताव पणन मंडळाला पाठवला आहे.

- किरण देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

‘कांदा आवक’ची होणार पडताळणी

कांदा अनुदानासंबंधीचा शासन निर्णय ३१ मार्चपूर्वी काढण्यात आला आणि अनेक ठिकाणी बनावटगिरी झाल्याची चर्चा झाली. डिसेंबर जानेवारीत कांदा विकलेल्यांच्या नावे पुन्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये कांदा विक्रीच्या रितसर पावत्या तयार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यातील संपूर्ण व्यवहाराची पडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाजार समितीनिहाय कांदा विक्री...

बाजार समिती कांदा विक्री

  • सोलापूर ५७,८७,९५१ क्विंटल

  • बार्शी ८०,७३७ क्विंटल

  • मंगळवेढा ७,३९३ क्विंटल

  • कुर्डुवाडी ३१,१०९ क्विंटल

  • अकलूज १२,९२० क्विंटल

  • पंढरपूर २२,५३६ क्विंटल

  • ‘लक्ष्मी-सोपान’ बार्शी ४,१२,५४० क्विंटल

  • एकूण ६३,५५,१८६ क्विंटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com