पाकिस्तानमधून भारतात आलेल्या 23 जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

मुंबई : पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
          
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून भारतात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, अशी भावना केसरकर व पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास प्रदान केले आहेत. या निर्णयानुसार जळगाव, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 23 नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, उपसचिव व्यंकटेश भट, उपसचिव युवराज अजेटराव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 citizens emigrated from Pakistan to India given Indian citizenship