chandrashekhar bawankule sand transportsakal
महाराष्ट्र बातम्या
Sand Transport : आता वाळू वाहतुकीस २४ तास परवानगी; महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या असून, प्रत्येक वाळूघाटाचे ‘जिओ-फेन्सिंग’ केले जाणार आहे.
मुंबई - राज्यात सुरू असलेली विविध प्रकल्पांची कामे आणि त्यासाठी लागणाऱ्या वाळूची गरज लक्षात घेता राज्यात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता२४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.