सोलापूर ग्रामीणमध्ये सापडले 260 उच्चांकी रुग्ण ! बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ, पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण 

तात्या लांडगे
Sunday, 19 July 2020

ठळक बाबी... 

 • रविवारी तब्बल दोन हजार 304 संशयितांची झाली कोरोना टेस्ट; 260 जण पॉझिटिव्ह 
 • आतापर्यंत 13 हजार 131 संशयितांची टेस्ट; एक हजार 823 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह 
 • आज चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या झाली 44 
 • आतापर्यंत 601 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 178 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यात सापडले 210 रुग्ण 

सोलापूर : सोलापूर ग्रामीणमधील दोन हजार 304 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 260 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून चिंचोली काटी येथील एका पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. तर बार्शी तालुक्‍यात 52, अक्‍कलकोट व माळशिरस तालुक्‍यात प्रत्येकी 44 तर मोहोळ तालुक्‍यात 40 आणि पंढरपूर तालुक्‍यात 30 रुग्ण सापडले आहेत. 

अक्‍कलकोट तालुक्‍यात रविवारी (ता. 19) 33 पुरुष आणि 11 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर बार्शीत 27 पुरुष तर 25 महिला, माळशिरसमध्ये 26 पुरुष आणि 18 महिला, मोहोळमध्ये 26 पुरुष तर 14 महिला, पंढरपूर तालुक्‍यात 18 पुरुष आणि 12 महिला, करमाळ्यात चार पुरुष, माढ्यात सात पुरुष तर तीन महिला, मंगळवेढ्यात पाच पुरुष, दोन महिला, उत्तर सोलापुरात सहा पुरुष तर सहा महिला, सांगोल्यात दोन महिला, दक्षिण सोलापुरात नऊ पुरुष तर आठ महिला कोरोनाबाधित सापडल्या आहेत. 

ठळक बाबी... 

 • रविवारी तब्बल दोन हजार 304 संशयितांची झाली कोरोना टेस्ट; 260 जण पॉझिटिव्ह 
 • आतापर्यंत 13 हजार 131 संशयितांची टेस्ट; एक हजार 823 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह 
 • आज चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या झाली 44 
 • आतापर्यंत 601 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 178 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यात सापडले 210 रुग्ण 

आतापर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • अक्‍कलकोट : 336 
 • बार्शी : 414 
 • करमाळा : 25 
 • माढा : 73 
 • माळशिरस : 76 
 • मंगळवेढा : 52 
 • मोहोळ : 141 
 • उत्तर सोलापूर : 152 
 • पंढरपूर : 135 
 • सांगोला : 12 
 • दक्षिण सोलापूर : 407 
 • एकूण : 1,823

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 260 high-end patients found in rural Solapur, highest number of patients in Barshi, Akkalkot, Malshiras, Mohol, Pandharpur