सोलापूर जिल्ह्यात ‘ही’ २७ मतदान केंद्रे संवेदनशील! २०१९च्या निवडणुकीत २१ केंद्रांवर एकाच उमेदवाराला ७५% टक्क्यांपेक्षा जास्त मतदान; तेथे आता वेब कास्टिंग व‌ केंद्रीय पोलिस बंदोबस्त

माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात तीन हजार ५९९ मतदान केंद्रे आहेत. त्यातील २७ संवेदनशील केंद्रांपैकी २१ केंद्रांवरील एकूण मतदान ९० टक्क्यांहून अधिक होते. तर एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
voter person
voter personsakal

सोलापूर : माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात तीन हजार ५९९ मतदान केंद्रे आहेत. त्यातील २७ संवेदनशील केंद्रांपैकी २१ केंद्रांवरील एकूण मतदान ९० टक्क्यांहून अधिक होते. तर एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. उर्वरित सहा मतदान केंद्रावरील दोन गटातील गोंधळामुळे पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या २७ केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले असून सध्या त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. पुढील आठवड्यात माढ्याचाही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल. १२ ते १९ एप्रिल या काळात उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. तर ७ मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरवात झाल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त जिल्हाभर तैनात असणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाचेही प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष असणार आहे. खासकरून संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून अधिक लक्ष दिले जाईल. या केंद्रांवर स्थानिक पोलिसांसोबतच केंद्रीय पथकातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था

जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त राहतो. त्या सर्व केंद्रांवर वेब कास्टिंगची यंत्रणा असेल आणि स्वतंत्र व्हिडिओग्राफर व मायक्रो ऑब्झरर्वर देखील असणार आहे. या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात बसून पाहता येणार आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

ग्रामीणमध्ये ७५०० पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर ग्रामीणमध्ये एकूण दोन हजार ३५६ मतदान केंद्रे असून सर्वाधिक संवेदनशील केंद्रे ग्रामीणमध्येच विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी मतदानावेळी ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्यात चार हजार ३०० पोलिस, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व पोलिस ठाण्यांमधील एकूण २३० अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पाच कंपन्या असणार आहेत. आता एक कंपनी ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात दाखल झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी चार कंपन्या येतील, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली. शहरात देखील तीन हजारांपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून एक ते दीड हजार होमगार्ड देखील घेतले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com