esakal | महाराष्ट्रात थैमान : म्युकरमायकोसिसमुळे राज्यात २८८ मृत्युमुखी
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात थैमान : म्युकरमायकोसिसमुळे राज्यात २८८ मृत्युमुखी

महाराष्ट्रात थैमान : म्युकरमायकोसिसमुळे राज्यात २८८ मृत्युमुखी

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : नव्यानेच म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजाराचे थैमान महाराष्ट्रात सुरू झाले आहे. अवघ्या महिनाभरात राज्यात ४ हजार ५० बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. २८८ (mucormycosis deaths) जणांना काळ्या बुरशीमुळे जीव गमावला लागल्याची माहिती पुढे आली आहे. (288 deaths due to mucormycosis in the state)

कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांवर स्ट्रेराईड तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. यामुळेच इतर आजारांनी डोकं वर काढले आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरला जाणारा ऑक्सिजन देण्यात आला. यामुळे बुरशीचा संसर्ग वाढल्याचे म्हटले जात आहे. तसेच व्हेंटिलेटरमध्ये डिस्टिल वॉटरचा वापर करण्यात आला नाही, यामुळे अनेकदा व्हेंटिलेटरमधील काही कणांमुळे हा आजार बळावला असल्याचे तज्ज्ञ सांगतात, तर काहींना स्टेरॉईडच्या अमर्याद वापरानेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

विशेष दातांशी संबधित, जबड्याशी संबधित, नेत्र तसेच कान नाक घसा या विकाराशी संबधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. बुरशीचा संसर्ग झाल्यावर चेहरा सुजणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलटी येणे, ताप येणे, छातीत दुखणे, साइनस कंजेशन, नाकाच्या आत आणि तोडांमध्ये काळे डाग येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. आधीपासून कॅन्सर, मधुमेहसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बुरशीचे आजार होण्याची अधिक शक्यता असते.

म्युकरमायकोसिस स्वच्छतेशी संबंधित आहे. यापासून वाचण्यासाठी बांधकामाची स्थळे किंवा धूळ असलेल्या परिसरापासून दूर राहावे. गार्डनिंग किंवा शेती करताना फूल स्लीव्स आणि ग्लोव्ज, मास्क वापरावे. अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांजवळ स्वच्छतेची काळजी घेतली जावी. वैद्यकीय उपकरणे स्वच्छ असावे.
- डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, नागपूर

राज्यात म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण - ४,०५०

राज्यात एकूण मृत्यू -२८८

बरे झालेले रुग्ण -६६६

उपचार सुरू असलेले रुग्ण ३०९६

(288 deaths due to mucormycosis in the state)