
नाशिक : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ (नाफेड) व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या दोन संस्थांनी प्रत्येकी दीड लाख टन असा एकूण तीन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाफेडने सदस्य सहकारी संस्थांकडून निविदा मागविल्या तर एनसीसीएफने शेतकरी उत्पादक कंपन्या, महासंघ, सहकारी संस्था व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून निविदा मागविल्या आहेत.