बदलीपूर्वी पोलिसांना ३ पर्याय! सोलापूर शहरातील २१० अंमलदारांच्या बदल्या; पोलिस आयुक्तांनी जाणून घेतले प्रत्येकाचे मत; आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील २१० पोलिस अंमलदारांच्या बुधवारी (ता. ३) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले हे अंमलदार आहेत. बदलीच्या ठिकाणी त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत.
solapur cp office

solapur cp office

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील २१० पोलिस अंमलदारांच्या बुधवारी (ता. ३) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले हे अंमलदार आहेत. बदलीच्या ठिकाणी त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत.

सोलापूर शहरात एमआयडीसी, विजापूर नाका, सलगर वस्ती, फौजदार चावडी, सदर बझार, जोडभावी पेठ आणि जेल रोड अशी सात पोलिस ठाणी आहेत. याशिवाय पोलिस आयुक्तालयात सायबर पोलिस ठाणेही आहे. तसेच डायल ११२, मुख्यालय, बॉम्बशोधक पथक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग, महिला भरोसा सेल, वाचक शाखा, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि शहर गुन्हे शाखा असे विभागही आहेत. बदलीनंतर एकाच ठिकाणी पाच वर्षे पूर्ण झालेल्या अंमलदारांची यादी यापूर्वी काढण्यात आली होती.

पोलिस आयुक्तांनी त्या सर्वांना बोलावून प्रत्येकाचे मत जाणून घेतले. त्यांना तीन पर्याय (रिक्त जागा असलेली पोलिस ठाणे किंवा अन्य विभाग) दिले होते. त्यासाठी मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. त्यावर पोलिस ठाणे किंवा अन्य विभागांमधील कार्यरत व रिक्त पदे दिसत होती. त्यातील एक ठिकाण त्या अंमलदारांना निवडायचे होते. आठ-दहा अंमलदारांचा अपवाद वगळता सर्व अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे नव्या ठिकाणी हजर राहण्यास होकार दिला. त्यांना आता दोन दिवसांत कार्यमुक्त होऊन बदलीच्या नव्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.

दोन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या

यापूर्वी बदली होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्याही आता याच महिन्यात बदल्या होणार आहेत. यात पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांत त्यांच्याही बदल्यांची कार्यवाही सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

dj free solapur
solapur city police comissioner m raj kumar
 Inspector of Police
IPS solapur SP Atul Kulkarni
Marathi News Esakal
www.esakal.com