सोलापुरात कार्यानुभव शिक्षकाकडून ३ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; वर्गात झाडू न मारल्याने खाली पाडून मारले; संस्थेने मुख्याध्यापक न केल्याचा राग

‘तुम्ही वर्गात झाडू का मारत नाहीत?’ असे म्हणून कार्यानुभव शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोलापुरातील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून नीलकंठ मठपती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur Crime
Solapur Crime
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : ‘तुम्ही वर्गात झाडू का मारत नाहीत?’ असे म्हणून कार्यानुभव शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोलापुरातील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून नीलकंठ मठपती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवारी (ता. २) इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा तास घेतो, असे सांगून कार्यानुभव शिक्षक नीलकंठ मठपती वर्गावर गेले. वर्गावर तास सुरू असताना त्यांनी वर्गातच स्वच्छतेचा तास सुरू केला. त्यावेळी तीन विद्यार्थी स्वच्छता करीत नव्हते. आपण सांगितलेले विद्यार्थी ऐकत नसल्याच्या रागातून त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पायावर, मांडीवर, पोटात, बरगडीवर व हातावर मारहाण केली.

विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर पालक शाळेत आले. त्या शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्ही बघतो, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मध्यस्थी केली. पालकांच्या तक्रारीवरून त्यांनी त्या शिक्षकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस हवालदार रूपनर तपास करीत आहेत.

संस्थेने मुख्याध्यापक केले नाही म्हणून...

कार्यानुभव शिक्षक नीलकंठ मठपती यांनी यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांना तीन वेळा मारहाण केली होती. त्याच्या तक्रारी शाळेकडे आल्या होत्या. संस्थेच्या प्रमुखांनी व मुख्याध्यापकांनी सतत त्यांना समजावून सांगितले होते. तरीदेखील त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना मारहाण केली. कार्यानुभवाचा स्वच्छतेचा तास घेतो, असे मुख्याध्यापकांना सांगून ते वर्गावर गेले आणि त्यांनी हा प्रकार केला. कार्यानुभवात स्वच्छतेच्या तासात वर्ग सुशोभीकरण किंवा परिसर स्वच्छता अपेक्षित होते. मात्र, वर्गाची स्वच्छता का केली नाही, या कारणावरून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना मुख्याध्यापक व्हायचे होते; परंतु संस्थेने ती जबाबदारी दिली नसल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यातूनच त्यांनी असे प्रकार केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com