राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

गुन्ह्याचा आकडा चिंताजनक वाढत असला तरी पूर्वी जनजागृती व बदनामीच्या भीतीने अत्याचार सहन केला जात होता.

राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार गुन्हे

यवतमाळ - महिला, (Women) अल्पवयीन मुलींवरील (Minor Girl) अत्याचाराला (Tyranny) आळा बसावा यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदेही कठोर करण्यात आले आहेत. तरीही अत्याचाराच्या घटनांचा आलेख हा चढताच आहे. २०२१ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार गुन्हे (Crime) नोंदविण्यात आले आहे.

गुन्ह्याचा आकडा चिंताजनक वाढत असला तरी पूर्वी जनजागृती व बदनामीच्या भीतीने अत्याचार सहन केला जात होता. परंतु, वाढत्या जनजागृतीमुळे अल्पवयीन मुलींचे पालक व महिलादेखील तक्रार करण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. महिलांवर केवळ बाहेरच अत्याचार होतात असे नाही तर घराच्या चौकटीतही महिला सुरक्षित नाहीत. जवळच्या नातेवाइकांकडून व पतीकडूनही अत्याचार केला जातो.

२०२१ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार १२५ गुन्हे नोंदविण्यात आल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर महिन्यापर्यंतची आहे. यात बलात्कार, अपहरणाच्या प्रत्येकी चार हजारांपेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत. पती वा नातेवाइकांकडून आठ हजार २४ महिलांवर अत्याचार करण्यात आला आहे. विनयभंगाचेही दहा हजारापेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.

नातेही असुरक्षित

लॉकडाऊन काळातच नाही तर इतर वेळीही महिला व मुलींवर जवळच्या नातेवाइकांनी अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे पवित्र नात्यालाही काळीमा फासला जात आहे, ही सर्वाधिक चिंताजनक बाब मानली जात आहे.

तीन वर्षांतील गुन्हे

गुन्हे शिर्ष-२०१९-२०२०-२०२१

बलात्कार-५४१६-४८४६-४२२७

अपहरण-६९०६-५२५४-४८८७

हुंडाबळी-१९६-१९७-१५८

क्रूर कृत्ये-८४३०-६७२९-८०२४

विनयभंग-१३६३२-१२६६४-१०१४८

लैंगिक अत्याचार-१०७४-१०१७-८२३

अनैतिक व्यापार-१५२-८५-१०४

इतर-१३०६-११६२-१७५४

एकूण -३७११२-३१९५४-३०१२५ (ऑक्टोबरपर्यंत)

Web Title: 30000 Crimes Of Atrocities Against Women In The State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top