"उजनी'तून सोडले भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी 

संतोष सिरसट 
Sunday, 13 September 2020

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची स्थिती 
सीना-माढा उपसा सिंचन योजना-259 क्‍सुसेक 
दहिगाव उपसा सिंचन-105 क्‍सुसेक 
बोगदा- एक हजार क्‍युसेक 
मुख्य कालवा-2450 क्‍सुसेक 
पॉवर हाऊस-1600 
भीमा नदी-3000 
धरणाचे उघडलेल्या दरवाज्यांची संख्या-16 
धरणातील पाणीसाठा-110 टक्के 
(आज दुपारी तीन वाजताची स्थिती) 

सोलापूर ः उजनी धरणामध्ये ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातून पाणी येत आहे, त्याचप्रमाणात धरणातून भीमा नदी, कालवा, बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडले जात आहे. आज दुपारी तीन वाजता धरणातून भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा धरणात येणारा प्रवाह पाहून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यात बदल केला जात असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. धरण भरल्यानंतर शेतकरी सुखावला जातो. धरणातील मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन पाटबंघारे विभागाच्यावतीने केले होते. तशाचप्रमाणे यंदाच्या वर्षीही नियोजन करण्याची तयारी विभागाने केली आहे. ऑगस्ट महिन्यातच धरण भरल्याने आता पाणी भीमा नदीमध्ये सोडल्याशिवाय पर्यायच उरत नाही. सकाळी सहा वाजता कमी असलेला भीमा नदीतील प्रवाह दुपारी तीन वाजता पुन्हा वाढविण्यात आला आहे. 

उजनी धरणावर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. धरणातून बोगद्याच्या माध्यमातून या उपसा सिंचन योजनांनाही पाणी दिले जाते. आता धरणातून बोगद्यात पाणी सोडले जात असल्याने उपसा सिंचन योजनाही कार्यान्वीत झाल्या आहेत. ज्या भागात पाऊस नाही त्या भागात या योजनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरु आहे. धरणात दुपारी तीन वाजता दौंड येथून 11 हजार 645 तर बंडगार्डन येथून सात हजार 207 क्‍सुसेकने पाणी येत आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31,600 cusecs of water released into the river Bhima from Ujani