
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) व माओवाद्यांमध्ये शुक्रवारी (ता. २३) झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार जहाल नक्षलवाद्यांना ठार केले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये दलमच्या कमांडर दर्जाच्या म्होरक्यासह तीन सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबतची माहिती दिली.