राज्यात रुग्णालयातील आगीच्या घटनेत आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू

fire
fire e sakal

मुंबई : राज्यात गेल्या १४-१५ महिन्यात रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये (Hospital Fire) जवळपास ५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अनेक आगीच्या घटना या कोविड रुग्णालयात (Covid Hospital) घडलेल्या आहेत. पण, खासगी आणि शासकीय दोन्ही पातळीवरील सुविधा अशा घटना रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

fire
सॅमने NCBला २५ लाख रुपये दिले होते - सुनिल पाटील

कोविड वॉर्डात आणि अतिदक्षता विभागात अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर होत असल्याने आगीच्या घटना घडू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. पाईपलाईन किंवा सिलिंडरमध्ये किरकोळ गळती असली तरी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, अग्निशमन साधनांचा अभाव, रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटचा अभाव यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचे दिसून येते.

वर्षाच्या सुरुवातीला भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागली होती. यामध्ये जवळपास ११ शिशूंचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत देखील अनेक आगींच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथे कोविड रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात आग लागली. यामध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. याठिकाणी अग्निशमन उपकरणे कमी होती असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनेकदा आगीच्या घटना घडूनही त्यांना रोखण्यात अद्याप प्रशासनाला यश आले नाही.

आग लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णालयात तात्पुरते किंवा कायमस्वरुपी फायर अलार्म असणे गरजेचे आहे. एक सक्षम अग्निशमन यंत्रणा असायला पाहिजे जेणेकरून आगीच्या घटनेपासून वेळीच सावध केल्यास रुग्णांचा जीव वाचू शकतो, असे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रताप खरगोपीकर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले.

कोविडच्या काळात अनेक रुग्णालये उभारण्यात आली. त्यामध्ये अग्निशमनसंबंधी सुविधांचा विचार केला गेला नाही. तसेच नॅशनल बिल्डींग कोडच्या गाईडनुसार या इमारती उभारण्यात आल्या नाहीत, असे मुंबईतील अग्नीशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com