ashadhi yatra st bussakal
महाराष्ट्र बातम्या
Ashadhi Yatra : आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस! ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून मिळणार थेट बस
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे केले नियोजन.
सोलापूर - आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.