Testing will done again for new strain of corona in Nagpur
Testing will done again for new strain of corona in Nagpur

राज्याची चिंता वाढतीच; आज 198 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद करण्या आली आहे.

मुंबई - राज्यातील कोरोना बाधितांची (Corona Cases rise in maharashtra) संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी राज्यात पाच हजारांहून अधिक रूग्णांची भर पडली आहे. तर आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज 198 नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोद झाली आहे. यातील 190 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर चार रुग्ण ठाण्यातील आहेत. बुधवारी राज्यात 85 नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळले होते. तर, मुंबईमध्ये आज 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Latest Corona Count )

आमिक्रॉनच्या रूग्णांचा आलेख वाढताच

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील ओमिक्रॉन (Omicron Cases In India ) बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 450 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून या ठिकाणी 327 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. (Omicron Count In Maharashtra) त्यामुळे राज्याच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली असून यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्या देशात महाराष्ट्र – 450, दिल्ली – 238, गुजरात – 97, तेलंगणा – 62, केरळ – 65, तामिळनाडू – 45, कर्नाटका – 39, राजस्थान – 69, ओडिसा – 08, आंध्र प्रदेश – 16, जम्मू-काश्मीर – 03, पश्चिम बंगाल – 11, उत्तर प्रदेश – 03, चंदीगड – 03, लदाख – 01, उत्तराखंड – 04, गोवा - 01, मध्य प्रदेश - 09, हिमाचल प्रदेश - 01, मणिपूर - 01, अंदमान-निकोबार - 03, हरियाणामध्ये - 12 आमिक्रॉनच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Omicron State wise count In India )

मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड टास्क फोर्सची तातडीनं बैठक बोलावली होती. यामध्ये वाढत्या रूग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आज किंवा उद्या रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Task Force Meeting)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com