Vidhan Sabha 2019 : भाजपचा पुन्हा 'विशेष कार्यक्रम'; काँग्रेसचे 6 आमदार गळाला?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

- भाजपच्या 'विशेष कार्यक्रम'च्या मेसेजने विरोधकांची उडवली झोप.

- काँग्रेसचे सहा आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.

मुंबई : भाजपच्या 'विशेष कार्यक्रम'च्या मेसेजने विरोधकांची चांगलीच झोप उडवली असून, आज आलेल्या या मेसेजमुळे विरोधी पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी पुन्हा सुरू झाली आहे. भाजपने ज्या-ज्या वेळी 'विशेष कार्यक्रम' आयोजित केला. त्या-त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपच्या कळपात सहभागी झाले. यामुळे आता 30 तारखेला भाजपच्या गळाला कोण-कोण लागलंय याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

भाजपचा 'विशेष कार्यक्रम' म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांची भाजपमध्ये 'मेगा भरती' असं समीकरण रूढ झालं आहे. उद्याच्या "विशेष कार्यक्रमा"चे प्रमुख पाहुणे हे काँग्रेसचे सहा आमदार असल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली तरीदेखील काँग्रेसमधील गळती काही केल्या थांबायला तयार नाही. काँग्रेसचे सहा विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आता हे सहा आमदार उद्या (ता. 30) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Vidhan Sabha 2019 : आक्रमक राष्ट्रवादीला मिळाला बूस्ट

काँग्रेसच्या या सहा आमदारांमध्ये मुंबईतील 1,धुळ्यातील 2 आणि सोलापुरातील 2 आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने जरी आपले आमदार जाणार नसल्याचे सांगितले असले तरी भाजपने मात्र उद्या (ता.30) दुपारी 12 वाजता मुंबईच्या गरवारे क्लब येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला असल्याचा निरोप माध्यमांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा "विशेष कार्यक्रम" संपन्न होणार आहे.

पडळकर म्हणाले, लोकांची भावना पाहून घेतला निर्णय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 MLA of Congress Party may join BJP tomorrow Maharashtra Vidhan Sabha 2019