सोलापूर लोकसभेसाठी 606 जणांनी केले मतदान! दिव्यांग व‌ 85 वर्षांवरील मतदारांच्या घरोघरी 80 पथके; रविवारी ‘या’ मतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान

ज्या दिव्यांग व 85वर्षांवरील मतदारांना केंद्रांवर येऊन मतदान करता येत नाही, त्यांचे मतदान करून घेणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी शुक्रवारी सोलापूर मतदारसंघातील अक्कलकोट, पंढरपूर व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील 606मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
solapur loksabha voting
solapur loksabha votingsakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर व माढा मतदारसंघाचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी, ज्या दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांना केंद्रांवर येऊन मतदान करता येत नाही, त्यांचे मतदान करून घेणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. २६) सोलापूर मतदारसंघातील अक्कलकोट, पंढरपूर व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ६०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ८५ वर्षांवरील एक हजार ३४२ तर १८१ दिव्यांग मतदारांनी घरबसल्या मतदान करणार असल्याचे कळविले आहे. त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके मतदान करून घेत आहेत. त्या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सुक्ष्म निरीक्षक (केंद्र सरकारचा कर्मचारी), मतदान सहायक अधिकारी, व्हिडिओग्राफर, शिपाई, बीएलओ, पोलिस, वाहन चालक यांचा या पथकात समावेश आहे. दररोज साधारणत: एक पथक १२ ते १३ मतदारांचेच मतदान करून घेऊ शकतो, अशी स्थिती आहे.

दक्षिण सोलापूर, शहर मध्य, मोहोळ या तीन विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांचे मतदान अजून घेतलेले नाही. सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग व ८५ वर्षांवरील (ज्यांनी घरी बसून मतदान करण्याचा पर्याय निवडला असे) दोन हजार २२६ मतदार आहेत. राहिलेल्यांचे मतदान बॅलेट पेपरवर पुढील तीन दिवसांत करून घेतले जाणार आहे.

अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मतदान

अत्यावश्यक सेवेतील पण ज्यांना निवडणूक ड्यूटीमुळे ७ मे रोजी त्या त्या मतदान केंद्रांवर मतदान करता येणार नाही, अशा ५२९ जणांचे मतदान रविवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. त्यासाठी टपाली सुविधा मतदान केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यात पोलिस, रेल्वे, राज्य राखीव पोलिस बलातील जवान, अग्निशामकचे कर्मचारी, टपाल खात्याचे व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी मतदान केलेले मतदार

  • १) शहर उत्तर : १० पथकांनी ८५ वर्षांवरील ९५ तर १३ दिव्यांग मतदारांकडून मतदान करून घेतले.

  • २) पंढरपूर : २० पथकांच्या उपस्थितीत ३१ दिव्यांग तर ८५ वर्षांवरील ३२६ मतदारांनी मतदान केले.

  • ३) अक्कलकोट : १५ पथकांच्या माध्यमातून ८५ वर्षांवरील १३१ व १० दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com