

Voting
ESakal
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतीचा या निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी घोषित केला आहे. या निवडणुकांसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तैनात असणार आहेत. तसेच साधारणतः ६६ हजार ७७५ निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.