राज्याच्या तिजोरीत ६ दिवसांत ६७८ कोटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

मुद्रांक शुल्क सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा घेतल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात तब्बल २ लाख ४० हजार ३३३ खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. त्यापैकी महिन्याच्या शेवटच्या सहा दिवसांत झालेल्या विक्रमी दस्तनोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ६७८ कोटी ४३ लाख रुपयांची भर पडली आहे.

महिन्यात अडीच लाख दस्त; मुद्रांक शुल्क सवलतीचा परिणाम
पुणे - मुद्रांक शुल्क सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा घेतल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात तब्बल २ लाख ४० हजार ३३३ खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. त्यापैकी महिन्याच्या शेवटच्या सहा दिवसांत झालेल्या विक्रमी दस्तनोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ६७८ कोटी ४३ लाख रुपयांची भर पडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना आणि आर्थिक मंदी यामुळे बांधकाम व्यवसायात मरगळ आली होती. त्याला चालना देण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत तीन टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सप्टेंबरपासून राज्यात सुरू झाली. विशेष म्हणजे २४ सप्टेंबरपर्यंत राज्यात १ लाख ५६ हजार ८६६ दस्त नोंदणी झाली होती. त्यातून सरकारला ८३६ कोटी ३१ लाख रूपये महसूल मिळाला होता. त्यांनतर सहा दिवसांत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत एकूण दस्तांची संख्या २ लाख ४० हजार ३३३ वर गेली. या सहा दिवसांत तब्बल ८३ हजार ४६७ दस्तांची नोंद झाली. त्यातून ६७८ कोटी ४३ लाख रूपयांचा महसूल सरकारला मिळाला.

प्रसिद्ध नृत्यांगणेनं २१ व्या वर्षी संपवलं जीवन; पुण्यात राहत्या घरी केली आत्महत्या

इतर वेळी दर दिवशी राज्यात ८ ते ९ हजार दस्तांची नोंदणी होते. मात्र या सहा दिवसांत दर दिवशी राज्यात १३ हजार ९१२ दस्तांची नोंद झाली असल्याचे यावरून समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात तब्बल ४९ हजार ४९२, तर २०१८ च्या तुलनेत २२ हजार १८२ ने दस्त नोंदणीच्या संख्येत वाढ झाली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 678 crore in 6 days in state safe