राज्यातील विजाभज आश्रमशाळेतील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ७००० टॅब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tab

विजाभज प्रवर्गाच्या इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने शिकता यावे व शिक्षण पद्धती रंजक व्हावी, तसेच विद्यार्थ्यामध्ये शिकणाची आवड निर्माण होऊन त्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी.

राज्यातील विजाभज आश्रमशाळेतील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ७००० टॅब

सासुरे - विजाभज प्रवर्गाच्या इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने शिकता यावे व शिक्षण पद्धती रंजक व्हावी, तसेच विद्यार्थ्यामध्ये शिकणाची आवड निर्माण होऊन त्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी, याकरिता राज्यातील पाचवी ते आठवी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे सात हजार टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यास अधिकृत प्रशासकीय मान्यताही मिळालेली असून याची लवकरच कार्यवाही होणार आहे.

यासाठी राज्यातील विजाभजविभागाच्या आश्रमशाळेत पाचवी ते आठवी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक जिल्हास्तरावरून मागविण्यात आलेली आहे. लवकरच आता विद्यार्थ्यांना टॅब मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक प्रवाहात आणणारा निर्णय

आश्रमशाळेत शिकणारी मुले भटक्या प्रवर्गातील असतात. तसेच साधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत आश्रमशाळेत शिकणारी मुले ही आर्थिक दृष्टया दुर्बल असल्याने ते कायमच आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहतात. प्रशासनाचा हा निर्णय त्यांना आधुनिक शिक्षण प्रवाहात आणणारा आहे.