कोरोनाचा विळखा! सोलापुरात गुरुवारी सापडले 71 पॉझिटिव्ह; सहा जाणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

प्रलंबित 209 अहवालाची लागली चिंता 
मागील काही दिवसांपासून महापालिका परिसरात एकही प्रलंबित अहवाल नव्हता, मात्र गुरुवारी (ता. 2) शहरातील 209 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आज सोलापुरात एकूण 71 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यापैकी तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्रलंबित अहवालाबाबत सोलापुकरांना चिंता लागली आहे. 

सोलापूर : शहरात आज 71 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णांची संख्या दोन हजार 397 झाली आहे. तर आजच्या सहा मृत्यूसह मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 261 वर पोहचली आहे. आता प्रलंबित असलेल्या 209 जणांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. 2) 45 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

 

सोलापूर शहरात आज धमश्री लाईन, वारद चाळ (मुरारजी पेठ), नागणे-देशमुख अर्पाटमेंट (बुधवार पेठ), ईएसआय हॉस्पिटल, गुरुवार पेठ, तुळजाभवानी नगर (अक्‍कलकोट रोड), सुपर मार्केटजवळ, दत्त चौक, भूमकर नगर (भवानी पेठ), न्यू बुधवार पेठ (बॉबी चौक), ओम नम शिवाय नगर (हत्तुरे वस्ती), रोहिणी नगर (भाग-3 सैफूल), प्रगती नगर, नेहरु नगर, बेघर सोसायटी, हरिकृष्ण अर्पाटमेंट (विजयपूर रोड), पूर्व मंगळवार पेठ, जोडभावी पेठ, राघवेंद्र निलयम (दत्त नगर), देशमुख-पाटील वस्ती (देगाव रोड), हब्बू वस्ती, देगाव नाका (थोबडे वस्ती), वर्धमान नगर (नाथ रेसिडेन्सी), शुक्रवार पेठ, श्री अर्पाटमेंट (बुधवार पेठ), राघवेंद्र नगर (होटगी रोड), दमाणी नगर, श्रीशैल नगर (भवानी पेठ), पूर्वा अर्पाटमेंट, शिवशाही किर्लोस्कर कॉलनी, ताई चौक (शांती चौक), विडी घरकूल, नवनीत हॉस्पिटल, बुधवार पेठ, सात रस्ता (रेल्वे लाईन), अश्‍विनी हॉस्पिटल, विमुक्‍त झोपडपट्टी (स्नेह नगर), सहारा नगर (लिमयेवाडी), उत्तर सदर बझार, उमा नगरी, प्रतिक नगर, गांधी कॉलनी (भैय्या चौक), बिलाल नगर, कल्याण नगर (जुळे सोलापूर), महर्षि गौतम सोसायटी, सिध्देश्‍वर नगर, जिशान हॉस्पिटल, कोणार्क नगर, थोबडे नगर (शेळगी), पारशी विहीर (कुमठा नाका) याठिकाणी गुरुवारी (ता. 2) नवे 71 रुग्ण सापडले. 

सहा जणांचा मृत्यू 
शहरातील कणके मंगल कार्यालयाजवळील शाहीर वस्ती, भवानी पेठेतील गवळी वस्तीत, भाग्यश्री नगर, स्वामी विवेकानंद नगर, भद्रावती पेठ, एमबीआय कॉलनी, भवानी पेठ, पूर्वा अर्पाटमेंट, रेल्वे लाईन येथील सहा व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील पाचजण 60 वर्षांवरील असून भद्रावती पेठेतील महिला 44 वर्षांची आहे. 

 

प्रलंबित 209 अहवालाची लागली चिंता 
मागील काही दिवसांपासून महापालिका परिसरात एकही प्रलंबित अहवाल नव्हता, मात्र गुरुवारी (ता. 2) शहरातील 209 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आज सोलापुरात एकूण 71 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यापैकी तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्रलंबित अहवालाबाबत सोलापुकरांना चिंता लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 71 positive found in Solapur on Thursday; Death of six