
सोलापूर : येथील महात्मा नागरी पतसंस्थेकडे गहाण असलेले दोन प्लॉट तिघांनी संगनमत करून बळकावल्याची घटना समोर आली आहे. मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून त्यांच्याऐवजी तोतया व्यक्ती उभी करून ३० लाख रुपयांच्या दोन जागा बळकावण्यात आल्याची फिर्याद जी. बी. कोरत (रा. वेंगोला, एर्नाकुलम, केरळ) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी जी. बी. कोरत हे केरळ राज्यात रहायला असून त्यांचे वडील २००२ च्या सुमारास सोलापुरात रहायला होते. त्यावेळी गुन्ह्यातील साक्षीदार सुनील वामनराव नान्नजकर त्यांच्या ओळखीचा होता. २००५ मध्ये कोरत यांचे निधन झाल्याचे सुनीलला माहीत होते. त्यांच्या मुलीने विश्वासाने सुनीलला सोलापुरातील प्लॉट विकायचे असल्याचे सांगितले होते. कोणी ग्राहक मिळाले का म्हणून फिर्यादी कोरत सतत सुनीलकडे विचारणा करीत होत्या. त्यावेळी ग्राहक बघतोय असेच तो सांगत राहिला. सुनीलने बसवराज चंद्रकांत बिराजदार (रा. पश्चिम मंगळवार पेठ) याला प्लॉटसंदर्भात विचारणा केली आणि त्यावेळी बसवराज स्वत:च प्लॉट घेण्यास तयार झाला. त्यावेळी सुनीलने फिर्यादी व त्यांच्या मुलीला बोलावून रीतसर खरेदीखत करू, असे सांगितले. पण, फिर्यादीचे वडील २००५ रोजी मयत झाल्याने बनावट आधारकार्ड तयार करून तोतया व्यक्ती उभी केल्यास सहजपणे प्लॉटची खरेदी घेता येईल, असे बसवराजने सांगितले.
खरेदीवेळी बसवराजने स्वत:च्या गाडीचा चालक बसवराज सिद्धाराम पुजारी (रा. सोलापूर) याला आणि सुनीलला साक्षीदार म्हणून घेतले आणि दोन्ही प्लॉट स्वत:च्या नावे करून घेतले. विशेष म्हणजे त्या दोन्ही प्लॉटवर महात्मा नागरी पतसंस्थेचे पाच लाख रुपयांचे कर्ज असताना देखील खरेदी-विक्री झाली, हे विशेष. आता पोलिस तो तोतया व्यक्ती कोण याचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक ढवळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.