मोठी बातमी! येत्या वर्षभरात होणार ७५ हजार रिक्त शासकीय पदांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

recruitment of 80 thousand post cm eknath shinde

मोठी बातमी! येत्या वर्षभरात होणार ७५ हजार रिक्त शासकीय पदांची भरती

मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून राज्यचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूऱाज देसाई यांनी सभागृहात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात ७५ हजार शासकिय रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

एमपीएससी तर्फे आकृतीबंधानुसार ही पदे भरण्यात येतील तसेच जिल्हा निवड समित्यांतर्फे भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के पदे देखील भरण्यात येतील असे शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात सांगितले.

यासोबतच मराठा समाजातील तरुणांसाठी देखील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, मराठा समाजातील तरुणांना आर्थिक दुर्बल गटामध्ये आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे. तसेच भरती प्रक्रीयेमध्ये अनियमीतता केलेल्या खाजगी कंपन्याचा या प्रक्रियेमध्ये समावेश होणार नसल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: CAG Report : विधानसभेत कॅगचा अहवाल सादर, कृषी क्षेत्रानं अर्थव्यवस्था तारली

Web Title: 75000 Govt Vacancies Will Be Recruited In The Coming Year Shambhuraj Desai Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..