राज्यात ८ प्रकारची ‘ई- फेरफार’

प्रशांत कोतकर
सोमवार, 24 जून 2019

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर जीसीसी क्‍लाउडवर नुकतेच झाले आहे. यामुळे जिल्ह्यांना ई हक्क प्रणाली पीडीईद्वारे आठ प्रकारची ई फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ३४ जिल्ह्यांतील कोणत्याही खातेदाराला आठ प्रकारात फेरफार घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज तलाठ्याकडे दाखल करता येणार आहे.

नाशिक - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर जीसीसी क्‍लाउडवर नुकतेच झाले आहे. यामुळे जिल्ह्यांना ई हक्क प्रणाली पीडीईद्वारे आठ प्रकारची ई फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ३४ जिल्ह्यांतील कोणत्याही खातेदाराला आठ प्रकारात फेरफार घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज तलाठ्याकडे दाखल करता येणार आहे. या प्रणालीच्या यशस्वी टेस्टिंग नंतर ही सुविधा जनतेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या प्रणालीमुळे डेटाएन्ट्रीचा तलाठी यांच्यावरील ताण कमी होणार आहे. 

ई फेरफार अंतर्गत वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, अज्ञानपालनकर्त्याचे नाव (अपाक) कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी/म्यानेजर (एकुम्या) कमी करणे व विश्‍वस्थांचे नाव कमी करणे या ८ नोंदीचा यात असमावेश आहे. हे ८ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई- हक्क प्रणालीतून ऑनलाइन पद्धतीने दाखल करता येतील. सध्या ही सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तथापि, तलाठी हे त्यांच्याकडे आलेले हस्तलिखित अर्ज https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फेरफार अर्जांवर कार्यवाही करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 types online e-ferfar project Government