

आर्वी : ‘‘राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, तसेच येत्या पाच वर्षांत राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १३) केले. विदर्भात उद्योग उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.