काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळी; 'या' 9 आमदारांसह अनेकजण भाजप-सेनेच्या वाटेवर

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळी; 'या' 9 आमदारांसह अनेकजण भाजप-सेनेच्या वाटेवर
Updated on

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. 

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त खिंडार पडण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.  

पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनॅलिसेस ब्युरो (PRAB)म्हणण्यानुसार, खालील आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत.

भारत भालके (काँग्रेस) पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप व्हाया शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

सिध्दाराम म्हेत्रे (काँग्रेस) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

जयकुमार गोरे (काँग्रेस) माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

रणजित शिंदे (राष्ट्रवादी) माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुत्र - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी) माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

दिलीप सोपल (राष्ट्रवादी) बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

ज्योती कलानी (राष्ट्रवादी) उल्हासनागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

संग्राम जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर द. विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - भाजप व्हाया शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ, खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे - शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

रमेश कदम (राष्ट्रवादी) मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार - शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार (उमेदवारी डावलल्यास) - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

प्रदीप कंद (राष्ट्रवादी) शिरूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान जि.प. पदाधिकारी (उमेदवारी डावलल्यास) - भाजप प्रवेशाच्या वाटेवर

चेतनसिंह केदार (राष्ट्रवादी) राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत - भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Axe Attack in Jawali Village Leaves One Dead; Police Arrest Eight Accused
HSRP Number Plates
Stamp Duty
Satara District Hospital Official Nabbed by ACB While Taking Rs 30,000 Bribe
Marathi News Esakal
www.esakal.com